Rumali Roti

लागणारा वेळ : २० मिनिटे 
जणांसाठी : ४

साहित्य :

  • १ कप मैदा
  • २ चमचे डालडा
  • १ कप गव्हाचे पीठ
  • १/२ चमचा तांदळाचे पीठ
  • दुध ( पीठ मळण्यासाठी)
  • मीठ (चवीनुसार)
कृती :
१. गव्हाचे पीठ, मैदा,मीठ एकत्र करून घ्या.
२. आता हळू हळू दुध घालून पीठ मळून घ्या.  पीठ एकदम मऊ मळावे.
३. १ तास फडक्याखाली तसेच ठेवा. म्हणजे चांगले मुरेल.
४. आता या पीठाचे २ छोटे गोळे घ्या. आणि हलक्या हाताने थोडेसे थापून घ्या. पुरी एवढा आकार द्या.
५. आता या छोट्या पुरीवर तूप आणि तांदळाचे पीठ लावा. आणि एकमेकांवर अशा पद्धतीने ठेवा कि पीठ लावलेले दोन्ही पुऱ्यांचे तोंड आत येईल.
६. आत पोळी लाटतो तशी हलक्या हाताने हि पोळी लाटून घ्या. पोळीवर अजिबात जोर देऊ नका. हि पोळी पातळ लाटून आली पाहिजे.
७. तवा तापत ठेवा. आता तव्यावर हि पोळी काळजीपूर्वक टाका.
८. १/२ मिनिटे भाजा. तव्याबाहेर काढली कि दोन्ही पोळ्या वेगळ्या करता आल्या पाहिजेत.
९. गरम खायला द्या.

टीप : दुधाच्या ऐवजी पाणी सुद्धा पीठ भिजवायला वापरू शकता. 

Rumali Roti Rumali Roti Reviewed by Prajakta Patil on April 02, 2012 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.