Raw Mango Juice - Kairiche Panhe

लागणारा वेळ : १० मिनटे
जणांसाठी : ४-५
साहित्य :
  • १/२ किलो कैरी
  • मीठ,गूळ (चवीनुसार)
  • वेलची पूड

कृती:१. कैरीची साले काढून फोडी कराव्यात.
२. कुकरात स्टीलच्या भांड्यात ठेवून वाफवून घ्याव्यात.
३. नंतर त्या फोडी पुरणयत्रांतून किंवा गाळण्यातून गाळून घ्याव्या.
४. नंतर त्यात मीठ व गूळ घालून मिश्रण सारखे करावे.
५. वेलचीपूड घालावी व थंडगार पाणी घालून पन्हे करावे.
टीप :
हे पन्हे चवीला फार छान लागते.
Raw Mango Juice - Kairiche Panhe Raw Mango Juice - Kairiche Panhe Reviewed by Prajakta Patil on April 15, 2012 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.