Noodles Raita

लागणारा वेळ : २० मिनटे
जणांसाठी : ५-६
साहित्य :

  • १/२ किलो नुडल्
  • १ वाटी काजूचे तुकडे
  • १ नारळ
  • 3 चमचा चिंचेचा कोळ
  • मीठ, गूळ(चवीनुसार)
  • २ चमचे साजूक तूप
  • १चमचा जिरे
  • हिंग (चिमुटभर)
  • १ मोठा चमचा बारीक चिरलेली हिरवी मिरची
  • चिरलेली कोथिंबीर


कृती:
१. चिंच भिजत घालून कोळ काढून ठेवावा.
२. ओलं खोबर,गूळ.चिंचेचा कोळ मिक्सरमधून फिरवून एकजीव करावं.
३. मिक्सरमध्ये वाटताना लागेल तसं पाणी घालाव.
४. नुडल्स उकळत्या पाण्यात शिजवून, निथळून घाव्या.
५. नुडल्स शिजताना त्यात चवीला मीठ, थोडं तेल आणि काजूचे तुकडे घालावे.
६. चमचा भर साजूक तूप,जीर, हिरवी मिरची घालून फोडणी करावी.
७. नुडल्स,खोबऱ्याच वाटण, फोडणी आणि चिरलेली कोथिंबीर घालून रायतं कालवाव.
Noodles Raita Noodles Raita Reviewed by Prajakta Patil on April 05, 2012 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.