Aamras - Mango Ras -आमरस

आमरस हा पुरी बरोबर खूप छान लागतो. महाराष्ट्रामध्ये आमरस-पुरी चा बेत (खास करून लग्नात) खूप ठिकाणी बघायला मिळतो. 

लागणारा वेळ : १५ मिनिटे
जणांसाठी : ४
साहित्य :
  • १ किलो हापूस आंबा
  • १/४ चमचा केशर
  • पिठीसाखर
  • २-१/२ कप दुध
  • वेलची पावडर (चवीनुसार)
कृती :
१. आंबे  धुऊन साले काढून घ्या.
२.  सोललेल्या आंब्याचे छोटे-छोटे तुकडे करा. 
३. सर्व तुकडे मिक्सर मध्ये घालून पेस्ट करून घ्या. 
४. त्यात दुध, चवीनुसार साखर आणि केशर घालून परत मिक्सर मधून एकजीव होईपर्यंत फिरवून घ्या.
५ . एका मोठ्या भांड्यात तयार आंब्याचे मिश्रण काढून घ्या.
६. रस खूप घट्ट वाटत असेल तर थोडे पाणी घाला.
७. वरून वेलची पावडर टाकून फ्रीजमध्ये ठेऊन द्या.
८. तयार थंडगार आमरस गरम-गरम पुरी बरोबर वाढा. 

Aamras - Mango Ras -आमरस Aamras - Mango Ras -आमरस Reviewed by Prajakta Patil on April 16, 2012 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.