Kaju-Katli (काजू-कतली)


साहित्य :
  • १ कप काजू
  • ३/४ कप साखर
  • १/४ कप पाणी
कृती :
१. मिक्सर मधून काजूची पावडर करून घ्या.
२. साखरेचा एकतारी पाक करून घ्या.
३. आता हा पाक काजूच्या पावडर मध्ये ओता. सारखे हलवत राहा म्हणजे गुठळ्या होणार नाहीत.
४. सारखे हलवत राहिल्याने मिश्रण जाडसर व्हायला सुरवात होईल.
५. चिमुटभर मिश्रण एका chilled पळते मध्ये घेऊन ते कडक झाले आहे कि नाही ते बघा.
६. जर झाले असेल तर गस बंद करून भांडे बाजूला काढा.
७. किंचित थंड झाले कि वरील मिश्रण एका परातीत ओता आणि चांगले मळून घ्या.
८. आता rolling pin ने १/४ इंच जाडसर असे butter-paper (Wax-paper) वर पसरा.
९. त्यावर चांदीचा वर्ख लावा. आणि diamond shape मध्ये कट करा. Dry झाले की wax-paper मध्ये गुंडाळून भांड्यात ठेऊन द्या.

टीप : जर थंड झाल्यावर काजूचे मिश्रण खूप पातळ वाटत असेल तर थोडे आणखी गरम करून घ्या आणि मग मळायला सुरवात करा.
जर थंड झाल्यावर काजूचे मिश्रण खूप कडक वाटत असेल, तर थोडेसे दुध घालून मळा.
ही काजू-कतली room-temprature ला १ आठवडा राहू शकते. आणि fridge मध्ये दीर्घकाळ राहते.
अशीच सेम recipe वापरून badam-katli करता येते.
Kaju-Katli (काजू-कतली) Kaju-Katli (काजू-कतली) Reviewed by Prajakta Patil on April 17, 2012 Rating: 5

1 comment:

web design firm said...
This comment has been removed by a blog administrator.
Powered by Blogger.