Kacchya Tomatochi Chatani

लागणारा वेळ : २० मिनटे
जणांसाठी : ४
साहित्य :

 • १/२ किलो कच्चे टोमाटो
 • २ भोपळी मिरच्या
 • १०-१२ हिरव्या मिरच्या
 • १ वाटी कोथिंबीर
 • मीठ, साखर(चवीनुसार)
 • १/२ वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट
 • २ मोठे चमचे तेल
 • १ मोठा चमचा जिरं
 • १ चमचा हिंग
 • चिमुटभर मेथीपूड
 • १ चमचा उडदाची डाळ
 • १०-१२ कढीलिंबाची पाने

कृती :
१. कच्चे टोमाटो आणि भोपळी मिरच्या चिरून घ्याव्या.
२. १ चमचा तेल वगळून उरलेल्या तेलाची फोडणी करावी.
३. फोडणीत मिरच्या,टोमाटो,भोपळी मिरची घालावी.
४. ५-६ पानं वगळून कढीलिंबाची पानं घालावी.
५. झाकण ठेवून टोमाटो शिजू द्यावे.
६. गार झाल्यावर त्यात कोथिंबीर,मीठ,साखर, दाण्याचा कूट घालून चटणी जाडसर करावी .
७. उरलेल्या तेलाची उडदाची डाळ आणि कढीलिंब घालून फोडणी घालावी.

Kacchya Tomatochi Chatani Kacchya Tomatochi Chatani Reviewed by Prajakta Patil on April 14, 2012 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.