Gajar Bhat (Carrot Rice)
लागणारा वेळ : ३० मिनिटे
जणांसाठी : ५-६

साहित्य :
  • २ वाट्या बासमती तांदूळ
  • १/४ किलो गाजर
  • १ मोठा कांदा
  • २-४ लवंग
  • २-३ दालचिनीचे तुकडे
  • २ चमचे तूप
  • मीठ (चवीनुसार)
कृती:
१. तांदूळ धुऊन २-३ तास निथळत ठेवावेत.
२. गाजरे नीट धुऊन किसून घ्यावीत.कांदा उभा चिरून घ्यावा.
३. तुपावर नेहमीप्रमाणे फोडणी करून त्यात लवंग,दालचिनी आणि कांदा टाकून बदामी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यावा.
४. आता त्यात किसलेले गाजर टाकून थोडे परतून घ्यावा. नंतर तांदूळ घालून परतावे.
५. तांदळाच्या दुप्पट पाणी आणि चवीनुसार मीठ घालून कुकरमध्ये 40 मिनिटे ठेवावे.

टीप : हा भात कोणत्याही करी बरोबर छान लागतो. वेगळाप्रकार म्हणून सर्वांनाच आवडतो .
Gajar Bhat (Carrot Rice) Gajar Bhat (Carrot Rice) Reviewed by Prajakta Patil on April 01, 2012 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.