Club Sandwich


लागणारा वेळ : १० मिनिटे
जणांसाठी : 4

साहित्य :
•१२ brown ब्रेड toasted slices
•४ चमचे कांदा आणि पुदिना चटणी
•४ कोबीची कोवळी पाने
•१६ काकडीचे काप
•१६ टोमाटोचे काप
•४ पीठ-पोळी
•२ चीज slice
पीठ-पोळी बनवण्याचे साहित्य :

•४ चमचे गव्हाचे पीठ
•३ चमचे ज्वारीचे पीठ
•३ चमचे बेसन पीठ
•१/२ कांदा बारीक कापलेला
•१ चमचा कोथिंबीर (बारीक कापलेली)
•२ हिरव्या मिरच्या (बारीक कापलेल्या)
•मीठ (चवीनुसार)
•२ चमचे तेल

पीठ-पोळी बनवण्याची कृती :
१. पीठ-पोळीचे सर्व साहित्य एकत्र करा आणि थोडे थोडे पाणी घालून त्याचे पातळ मिश्रण तयार करा.
२. तवा तापत ठेवा आणि त्यावर तेल टाका.
३. तेल तापले कि थोडेसे मिश्रण तव्यात असे ओता कि त्याचा थोडासा जाडसर पोळा बनला पाहिजे.
४. दोन्ही बाजूने व्यवस्थित सोनेरी रंगाचे होईपर्यंत fry करून घ्या.
५. असाच आणखी १ पोळा बनवा.

sandwich कृती :

१. सर्व ब्रेडना चटणी लावून घ्या.
२. आता पहिला ब्रेड घ्या आणि त्यावर १ पीठ-पोळा लावा. आणि त्यावर दुसरा ब्रेड ठेवा. (चटणी लावलेली बाजू वर आली पाहिजे)
३. आता ह्या ब्रेड वर १ कोबीचे पान, १ चीज slice, ४ काकडीचे कप, ४ टोमाटोचे काप लावा. आता तिसरा ब्रेड ठेवा.
४. हा sandwich ४ पार्टस मध्ये कापा.
५. अश्या प्रकारे अजून एक sandwich बनवा आणि टोमाटो ketch-up बरोबर सर्व करा.

टीप : ह्या sandwich मध्ये तुमी आवडीनुसार चिकनचे तुकडे घालू शकता
Club Sandwich Club Sandwich Reviewed by Prajakta Patil on April 04, 2012 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.