Chocolate Cake


लागणारा वेळ : १ तास
जणांसाठी : १०-१२

साहित्य
:
 • ३ चमचे कोका पावडर
 • ३/४ कप बटर (melted)
 • १ कप साखर
 • २ अंडी
 • १ १/२ कप मैदा
 • २ चमचे बेकिंग सोडा
 • २ चमचे बेकिंग पावडर
 • १/२ चमचा मीठ
 • १ १/२ चमचा व्हयानिला रस
 • ३/४ कप दुध
Frosting साहित्य :
 • १/२ कप + ३ चमचे बटर (melted)
 • ३ कप पिठीसाखर
 • १/२ कप कोका पावडर (unsweetened)
 • १ १/२ चमचा व्हयानिला रस
 • ५ चमचे कोमट दुध
कृती :
 1. ओव्हन ३५० deg F गरम करून घ्या.
 2. केक च्या डब्याला ९ इंच तुपाचा हात लावून घ्या.
 3. एका भांड्यात कोका पावडर,मैदा,साखर आणि व्हयानिला रस आणि मीठ एकत्र करून घ्या.
 4. आता वरील मिश्रणात melted बटर, दुध आणि अंडी घाला.
 5. सर्व मिश्रण हळू हळू एकजीव करून घ्या.
 6. मिश्रण केक च्या भांड्यात ओता. आणि साधारण ३०-४० मिनटे bake करा. केक बाहेर काढायच्या आधी एक लाकडी काडी केकमध्ये insert करून बघा. जर ती clean बाहेर आली तर केक झाला आहे असे समजावे.
 7. केक बाहेर काढल्यानंतर त्याला बरोबर मधून असा कप कि त्याचे समान दोन तुकडे होतील.
Frosting कृती :
 1. melted बटर आणि पिठीसाखर एका भांड्यात घेऊन घोटा.
 2. त्यात कोका पावडर, व्हयानिला आणि कोमट दुध घालून smooth होईपर्यंत घोटा.
 3. हे घोटलेले मिश्रण विरळ केकच्या च्या दोन तुकड्यांमध्ये, थोडे वरती आणि थोडे आजू-बाजूला व्यवस्थित ओता.
 4. chocolate sticks ने सजवा.
टीप :
 • तुम्ही केक चे २ पेक्ष्या जास्त तुकडे करून त्यात हे Frosting मिश्रण भरू शकता.
 • तुम्ही केक ची २-३ भांडी वापरून medium केक बनवू शकता. जेणेकरून तुम्हाला Frosting साठी केक कापावा लागणार नाही.
Chocolate Cake Chocolate Cake Reviewed by Prajakta Patil on April 13, 2012 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.