Chiken Soup - चिकन सूप


लागणारा वेळ : ३० मिनटे
जणांसाठी : ४
साहित्य :
 • १०० gram चिकनचे तुकडे (boneless)
 • १०० mls chicken stock
 • १ कांदा बारीक कापलेला
 • ३/४ गाजर बारीक कापलेली
 • १ जुडी celery बारीक कापलेली
 • २ हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या
 • १ चमचा आल्याची paste
 • १ अंड्याचे पांढरे
 • १ चमचा vinegar
 • २ चमचे cornflour
 • साखर, मीठ, pepper चवीनुसार
कृती :
१. वरील सर्व साहित्य (cornflour सोडून) एकत्र करा. आणि १५ मिनटे medium gas वर झाकण ठेऊन शिजवून घ्या. चिकनचे तुकडे नीट शिजले पाहिजेत.
२. आता भांड्यातील शिजलेले चिकनचे तुकडे बाजूला काढून घ्या. आणि त्याचे छोटे छोटे उभे तुकडे करून घ्या.
३. हे तुकडे परत त्याच भांड्यात टाका.
४. एका छोट्या भांड्यात cornflour घ्या. आणि त्यात थोडा चिकन चा stock घाला. नीट एकजीव करून वरील भांड्यात टाका.
५. २ मिनटे high gas वर ढवळत शिजवून घ्या.
६. गरम गरम serve करा.
Chiken Soup - चिकन सूप Chiken Soup - चिकन सूप Reviewed by Prajakta Patil on April 26, 2012 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.