Chicken Hara Bhara Kebab


लागणारा वेळ : ४५ मिनिटे 
जणांसाठी : ३-४

साहित्य :
  • ०.४५ किलो chicken breasts
  • १/२ कप बारीक चिरलेली कोथिंबीर
  • २ चमचे बारीक चिरलेली तुळशीची पाने
  • २ चमचे आले-लसूण पेस्ट
  • मसाल्यासाठी - १ तुकडा दालचिनी, १/४ काळी मिरी पावडर, २ चमचे घट्ट दही
  • १ चमचा लिंबाचा रस
  • मीठ (चवीनुसार)
  • चाट मसाला
कृती :
१. मसाला आणि कोथिंबीर, तुळशीची पाने सर्व एकत्र मिक्सर मध्ये वाटून घ्यावे. वाटताना पाणी अजिबात घालू नये.
२. ह्या वाटलेल्या मिश्रणात लिंबाचा रस घालावा.
३. चिकन नीट धुऊन त्याचे बेताचे तुकडे करून घ्या.
४. आता वरील वाटलेला मसाला आणि दही ह्या चिकन मध्ये घाला. मीठ घालून हे मिश्रण एकजीव करून घ्या.
५. कमीत कमी ४ तास हे मिश्रण फ्रीज मध्ये ठेवून द्या. (रात्रभर ठेवले तर अधिक चांगले)
६. ओव्हन ३०० डिग्री तापमानाला preheat करून घ्या.
७. चिकन चे तुकडे कबाब स्टिक वर लावून ते ओव्हन मध्ये चांगले शिजेपर्यंत भाजून घ्या.
८. बाहेर काढून त्यावर चाट मसाला आणि fried onion बरोबर serve करा.

टीप : चिकन चे तुकडे ओव्हन मध्ये ठेवताना, आधी एक foil खाली पसरा. त्यावर हे तुकडे ठेऊन, या तुकड्यांवर आणखी एक foil लावा. पूर्ण शिजून झाले कि foil काढून परत २ मिनिटे ओव्हन मध्ये भाजा. यामुळे चिकन वर कडक आवरण तयार होते.
Chicken Hara Bhara Kebab Chicken Hara Bhara Kebab Reviewed by Prajakta Patil on April 01, 2012 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.