Dalimbi Bhat

साहित्य :
 • ६ वाट्या तांदूळ
 • ४ वाट्या सोललेल्या डाळींब्या
 • १ चमचा आलं वाटण
 • १ चमचा लसून वाटण
 • १/२ वाटी सुकं खोबरं किसून व दोन चमचे जिरे एकत्र करून बारीक करून घ्यावं
 • २ काड्या कढीलिंबाची पाने
 • १ वाटी तेल
 • १ चमचा दालचिनी पूड
 • १/२ चमचा लवंग पूड
 • पाव चमचा मिरपूड
 • १चमचा गोडा मसाला
 • ४ चमचे तूप
 • ४ वाट्या टोमाटो बारीक चिरून
 • १ वाटी ओलं खोबरं
 • १ वाटी कोथिंबीर

कृती :
 1. प्रथम तांदूळ धुऊन ठेवावेत तांदळाच्या दुपट पाणी गरम करायला ठेवावं.
 2. जाड बुडाच्या पातेल्यात तेल गरम करावं.
 3. त्यात मोहरी,टाकून ती तडतडल्यावर त्यात जिरं,हिंग,हळद,कढीलिंब घालवं.
 4. नंतर त्यात आलं-लसून वाटण घालून थोडं परतून घ्यावं.
 5. त्यातच डाळींब्या टाकाव्यात.टोमाटो व तांदूळ हि घालून सर्व नीट परतून घ्यावं.
 6. त्यातच जिरं,खोबरं , मीठ, मसाले टाकून, तांदळाच्या दोन ते सव्वादोन पट पाणी गरम घालवं व चार चमचे तूप सोडून मऊसर भात शिजवून घ्यावा.

टीप : वरून ओलं खोबरं कोथिंबीर लावी.
Dalimbi Bhat Dalimbi Bhat Reviewed by Prajakta Patil on April 09, 2012 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.