Shimplyache Salad (Sea Shell Salad) | Mejwani Recipes


लागणारा वेळ : २० मिनिटे
जणांसाठी : ८
साहित्य
:
 • कप शिंपले न शिजवलेले
 • कप उकडलेली अंडी (छोटे तुकडे करून )
 • कप बारीक चिरलेला कांदा
 • १/४ उकडलेले मक्याचे दाणे
 • कप बारीक चिरलेला टोमाटो
 • (चवीनुसार)
 • १/४ चमचे तेल
 • १/४ चमचे मोहरी
 • १/२ चमचे अज्मोडा
 • हळद, मीठ, लाल तिखट, लिंबाचा रस, काळी मिरी पावडर (चवीनुसार)
 • कोथिंबीर सजावटीसाठी
कृती :
१. एका भांड्यात शिंपले घ्या. त्यात पाणी टाका. आणि शिजत ठेवा. पूर्ण शिजल्यावर पाणी काढून टाका आणि त्यातील खायचा भाग बाहेर काढा .
२. आता एका भांड्यात तेल घेऊन ते गरम करा. तेल गरम झाले कि मोहरी टाकून मग हळद, लाल तिखट, अज्मोडा, काळी मिरी पोवडेर टाकून थोडेसे परतून घ्या.
3. मग त्यात कांदा, टोमाटो, उकडलेले मक्याचे दाणे, उकडलेली अंडी आणि शिंपले घालून थोडेसे परतून एकजीव करून घ्या.
४. थोडेसे लिंबू पिळा. वरून कोथिंबीर घालून फ्रीज मध्ये ठेऊन द्या.
५. थंड झाले की  सर्व्ह करा.
हे सलाड आपण कच्चे पण तयार करू शकतो. स्टेप १ नंतर लगेच स्टेप २ केल्याने कच्चे शिम्पल्याचे सलाड तयार होईल.
Shimplyache Salad (Sea Shell Salad) | Mejwani Recipes Shimplyache Salad (Sea Shell Salad) | Mejwani Recipes Reviewed by Prajakta Patil on March 29, 2012 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.