Makyachya Pithacha cake (Cornflour Cake) | Mejwani Recipes


लागणारा वेळ : २० मिनिटे 
जणांसाठी : ६
साहित्य :
  • २ अंडी (पांढरे आणि पिवळे वेगळे केलेलं असावे )
  • १/२ कप मक्याचे पीठ (cornflour )
  • १/३ कप कॅस्टोर शुगर
  • १/२ चमचा bicarbonated सोडा
  • १/४ चमचे क्रीम ऑफ tartar
  • १/२ चमचा vanilla extract
कृती :
१. ओव्हन १८० डिग्री तापमानास गरम करून घ्या.
२. अंड्याचे पांढरे चांगले फेटून घ्या. आणि त्यात साखर टाका.
३. आता त्यात अंड्याचे पिवळे टाकून एकजीव करून घ्या.
४. मक्याचे पीठ, bicarbonated सोडा आणि क्रीम ऑफ tartar एकत्र करून व्यवस्थित चाळून घ्या.
५. चाळून झाले कि त्यात vanilla extract टाकून एकत्र करून घ्या.
६. केक च्या भांड्याला आतून बटर चा हात चोळा.
७. आता वरील मिश्रण ह्या केकच्या भांड्यात ओता.
८. ओव्हन मध्ये २० मिनिटे भाजा.

टीप
: ह्यात १ १/२ चमचे कोका पावडर टाकून चोकलेट कॉर्नफ्लॉवर केक तयार करू शकता.
Makyachya Pithacha cake (Cornflour Cake) | Mejwani Recipes Makyachya Pithacha cake (Cornflour Cake) | Mejwani Recipes Reviewed by Prajakta Patil on March 29, 2012 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.