Gajaracha Cake (Carrot Cake) | Mejwani Recipes

गाजराचा केक हि माझी आवडत्या dish पैकी एक dish. पहिल्यांदा खूप कठीण वाटला बनवताना पण २-३ वेळा practice केल्यानंतर मला आता  केक सहज जमायला लागला आहे. हा आहे अंडे वापरून बनवलेला गाजर केक (carrot cake). पण जी लोकं शाकाहारी त्यांचे काय? त्यांच्यासाठी खास म्हणून बिनअंड्याचा गाजर केक (Eggless Carrot Cake) देत आहे.  नक्की करून पहा !!!लागणारा वेळ : ३०मिनिटे
जणांसाठी : १०

साहित्य
:
४ कप किसलेले गाजर
२ चमचे बेकिंग पावडर
२ कप मैदा
४ अंडी
२ कप साखर
१ कप तेल
२ चमचे दालचिनी
१ कप बेदाणे
२ चमचे बेकिंग सोडा

कृती :
१. मैद्यामध्ये साखर, बेकिंग पावडर, दालचिनी, बेकिंग सोडा टाकून एकत्र करून घ्या.
२. दुसऱ्या भांड्यामध्ये अंडी व्यवस्थित फेटून घ्या. अंडी फेटून झाली कि त्यात तेल घाला.
३. आता या फेटलेल्या अंड्यामध्ये मैद्याचे मिश्रण आणि किसलेले गाजर घाला.
४. गुठळ्या होऊ न देण्यासाठी हे मिश्रण परत एकदा व्यवस्थित फेटून घ्या.
५. केक च्या भांड्याला बटर पेपर लावून घ्या,
६. आणि वरील मिश्रण ह्या भांड्यात ओता.
६. १७५ - १८० डिग्री सेल्सियसवर २० - २२ मिनिटे बेक करा.
Gajaracha Cake (Carrot Cake) | Mejwani Recipes Gajaracha Cake (Carrot Cake) | Mejwani Recipes Reviewed by Prajakta Patil on March 28, 2012 Rating: 5

3 comments:

Anonymous said...

gajaracha veg cake banavayacha aahe tar kay sahitya lagel?

Prajakta Patil said...
This comment has been removed by the author.
Prajakta Patil said...

Thanks for your comment.
gajaracha eggless cake banavnyachi kruti mi post keli aahe. Tichi link khalilpramane :

Gajaracha Cake (eggless)

Powered by Blogger.