kelyachya Purya (Banana flavored puri) | Mejwani Recipesलागणारा वेळ : २० मिनिटे
जणांसाठी :

साहित्य :
2 केळी
वेलची पावडर (चवीनुसार)
२/३ चमचे तूप
२/३ चमचे रवा
१/८ किलो गव्हाचे पीठ
साखर (चवीनुसार)

कृती :
१.सर्व केळी चुरून घ्या. नंतर त्यात साखर, वेलची पावडर आणि तूप (गरम केलेले पातळ असावे) घाला.
२. आता गव्हाचे पीठ मळायला घ्यावे. मळताना त्यात रवा घालावा.
३. आणि वरील केळ्याचे मिश्रण घालून घट्ट पीठ मळून घ्यावे.
४. नेहमीप्रमाणे पुऱ्या लाटून घ्याव्यात.
५. तेल गरम झाले कि पुऱ्या तळून घाव्यात.
६. साधारण सोनेरी रंगाच्या पुऱ्या काढाव्यात.

ह्या पुरया चवीला गोड लागतात. केळे आणि वेलचीमुळे  तर स्वाद आणखीनच छान लागतो.
kelyachya Purya (Banana flavored puri) | Mejwani Recipes kelyachya Purya (Banana flavored puri) | Mejwani Recipes Reviewed by Prajakta Patil on March 27, 2012 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.